ब्लॉगिंग (Blogging) म्हणजे काय? आणि ब्लॉगिंग विषयीचे काही गैरसमज

ब्लॉग (Blog) म्हणजे काय?

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, ब्लॉग हे एक ऑनलाइन माध्यम आहे. जसे कि, तुमची डायरी असते जिथे तुम्ही माहिती लिहून ठेवत असता. आणि जेव्हा असेच एखाद्या विषयाची माहिती ऑनलाइन लिहिली जाते त्याला ब्लॉग म्हटले जाते.

आणि हि माहिती कोणतीही असू शकते, तुमचे स्वतःचे विचार असू शकता, तुमचे एखाद्या विशिष्ट विषयाचे ज्ञान किंवा काही वास्तविक, काल्पनिक गोष्टी इत्यादी काहीही असू शकते.

ब्लॉगर (Blogger) म्हणजे काय?

ब्लॉगर म्हणजे असा व्यक्ती जो ब्लॉग साठी माहिती लिहीत असतो. तो त्याचे विचार, अनुभव त्याच्या वाचकांसोबत शेअर करत असतो. जसे कि, फूड ब्लॉगर, ट्रॅव्हल ब्लॉगर इत्यादी.

तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीचा विषय निवडून, त्या विषय संबंधित लेख (articles) लिहून ब्लॉगर बनू शकता.

ब्लॉगिंग (Blogging) म्हणजे काय?

ब्लॉग लिहिण्याची आणि त्यात सातत्य टिकवून ठेवण्याची कला म्हणजे ब्लॉगिंग.

Writing Blog on Laptop
Credit: Photo by NeONBRAND on Unsplash

ब्लॉगिंग इतके लोकप्रिय का आहे?

आजकाल हवी ती माहिती मिळविण्यासाठी ब्लॉग हे प्रमुख माध्यम होऊ लागले आहे. बरेच लोक आत वृत्तपत्र (newspaper) आणि मॅगझीन (magazines) वाचण्याऐवजी ऑनलाइन ब्लॉग किंवा e-newspaper वाचण्यास प्राधान्य देतात. कारण ऑनलाइन आपल्याला हवी ती माहिती गुगल (Google) च्या मदतीने सहजपणे मिळविता येते.

ब्लॉग वाचत असताना, काही वाचक ब्लॉग वर कंमेंट लिहितात. अशा संभाषणाच्या माध्यमाने ते लेखक तसेच त्या विषयात आवड असलेल्या इतर वाचकांसोबत जोडले जातात.

ब्लॉगिंग च्या मदतीने तुम्ही पैसे देखील कमवू शकता आणि ब्लॉगिंग लोकप्रिय असण्यामागे हेच सर्वात मुख्य कारण आहे.

ब्लॉग आणि वेबसाइटमध्ये काय फरक आहे?

Blog Screenshot

येथे तुम्ही बघू शकता DigitalPushkraj.com ही एक ब्लॉगसाईट आहे. येथे तुम्हाला फक्त काही ब्लॉग किंवा लेख (articles) लिहिलेले दिसतील. त्या व्यतिरिक्त जास्त काही दिसणार नाही. हा पण या सोबत तुम्ही ब्लॉगसाइट वर ब्लॉग मध्ये काही प्रमाणात ऑडिओ किंवा विडिओ देखील वापरू शकता.

उदाहरणासाठी बघायचे झाले तर फूड ब्लॉग. यावर वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळू शकता. याला तुम्ही ब्लॉग साईट म्हणू शकता.
ब्लॉग साईटलाच शॉर्टकट मध्ये ब्लॉग देखील म्हटले जाते.

Website Screenshot

आता, वर तुम्ही Common Floor हि वेबसाइट पाहू शकता. हि प्रामुख्याने रिअल इस्टेट वेबसाइट आहे, जिथे तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार आणि स्थानानुसार रिअल इस्टेटची मालमत्ता मिळू शकते, तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकता आणि इतर बरेच पर्याय त्यांच्या साइटवर उपलब्ध आहेत त्यामुळे आपण त्यास ब्लॉग नाही, तर रिअल इस्टेट वेबसाइट म्हणणार.

परंतु त्यांच्या वेबसाइट वर मेन्यू मध्ये Blog चे देखील ऑप्शन दिलेले आहे. ज्याच्या वर तुम्ही क्लीक केले तर त्यांची दुसरी ब्लॉग साईट ओपन होते.

अशा प्रकारे तुम्ही तुमची ब्लॉग साईट देखील तुमच्या वेबसाइट सोबत कनेक्ट करू शकता किंवा तुमची फक्त ब्लॉग साईट (Blog) बनवू शकता.

मी अशा करतो कि आता तुम्हाला ब्लॉग आणि वेबसाइट या मधील फरक लक्षात आला असेल.

आपण ब्लॉग, ब्लॉगर, ब्लॉगिंग म्हणजे काय हे बघितले. ब्लॉगिंग इतके लोकप्रिय का आहे हे सामाऊन घेतले, तसेच ब्लॉग आणि वेबसाइट या मधील फरक सुद्धा समजून घेतला.

आता या पेक्षा अजून महत्वाचा भाग इथे पुढे आहे. तुम्हाला जर एक यशस्वी ब्लॉगर व्हायचे असेल तर तुम्ही पुढील भाग काळजी पूर्वक वाचून समजून घेतला पाहिजे. कारण बरेच लोकं खाली ज्या गोष्टी दिलेल्या आहेत ते समजून घेत नाहीत आणि मग त्यांना त्यांचा ब्लॉगिंग चा प्रवास लवकरच थांबवावा लागतो. तुमच्या सोबत असे होऊ नये त्या साठी पुढील भाग खूप महत्वाचा आहे.

ब्लॉगिंग विषयी काही गैरसमज

१. ब्लॉगिंग मध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला नशीबवान असले पाहिजे

Good Luck

लोक बऱ्याच वेळा बोलतात कि ब्लॉगिंग मध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्ही नशीबवान असले पाहिजे.

परंतु येथे मला तुम्हाला सांगायचे आहे कि ब्लॉगिंग आणि नशीब याचा काहीही एक संबंध नाहीये. जे कोणी यशस्वी ब्लॉगर आहेत त्यांनी सुरवात केली आणि ते लगेच यशाच्या शिखरावरं पोहचले असे नाहीये.

त्यांनी कठोर परिश्रम घेतले. . .

त्यांनी वारंवार प्रयत्न करून कोणत्या गोष्टी ब्लॉगिंग साठी बरोबर आणि कोणत्या चुकीच्या आहेत हे समजून घेऊन त्यात ते बदल करत राहिले.

तासंतास ते त्यांचा वेळ लिहिण्यात आणि प्रोमोशन (मार्केटिंग) साठी दिला.

आणि फक्त काही तास, दिवस नाही, तर महिने आणि वर्षे ते प्रयत्न करत राहिले आणि मग ते यशस्वी झाले.

आशा प्रकारे त्यांच्या यशाच्या मागे त्यांचे नशीब नसून त्यांची मेहनत आहे.

२. तुमच्या कडे खूप जास्त ऑडियन्स (वाचक) किंवा Views पाहिजे.

Audience

बरेच लोक विचार करतात कि माझ्याकडे मोठ्या प्रमाणावर ऑडियन्स असेल, माझे खूप सारे फॉलोवर्स असतील, माझ्या ब्लॉगला खूप जास्त views येत असतील तरच मी ब्लॉगिंग मध्ये यशस्वी होऊ शकतो.

परंतु येथे तसा नाहीये. तुम्हाला मोठ्या प्रमाणावर ऑडियन्स नाही पाहिजे आणि जास्त views देखील नाही पाहिजेत.

तुम्हाला योग्य अशी Audience (वाचक) पाहिजेत. तुमच्याकडे फक्त काही शंभर, हजारच्या आसपास ऑडियन्स (वाचक) असेल आणि तुम्ही त्यांना योग्य आणि उपयुक्त अशी माहिती देत असाल आणि त्यांना तुम्ही माहिती, तुमचे ब्लॉग आवडत असतील तर पुढे जाऊन तुम्ही तुमच्या याच ऑडियन्सला तुमच्या कस्टमर (ग्राहक) मध्ये कन्व्हर्ट (बदलू) करू शकता.

तसेच ते एकदा का तुमचे कस्टमर झालेत आणि तुम्ही त्यांना योग्य असा सपोर्ट करत राहिलात तर ते स्वतःहून तुमच्या विषयी लोकांना सांगणार आणि अशाप्रकारे हळू हळू तुमची ऑडियन्स वाढत जाणार.

मी असे लोक बघितले आहेत जे काही हजार लोकांच्या Email लिस्ट च्या मदतीने लाखो, करोडो रुपये कमवतात आणि काही असे देखील बघितले आहेत ज्यांच्याकडे लाखो च्या संख्येने Email ची लिस्ट असते आणि ते काही हजारांमध्येच कमवत असतात.

त्यामुळे येथे यशाचे रहस्य आहे कि जास्त ऑडियन्स मिळवण्यापेक्षा योग्य ऑडियन्स मिळवण्यावर तुमचे लक्ष केंद्रित करा.

3. ब्लॉगिंग हे मोफत (Free) होऊ शकते.

Free

नाही. असे नाहीये, जर तुम्हाला ब्लॉगिंग मध्ये यशस्वी व्हायचे असेल तर.

समजा तुम्ही xyz.blogspot.com अशी एखादी वेबसाइट बनवली तर ती Free मध्ये बनणार. परंतु त्या वेबसाइटच्या नावात blogspot.com असल्यामुळे तिथे तुमची काहीच ब्रॅण्डिंग (Branding)/ पर्सनल ब्रॅण्डिंग होणार नाही.

तुम्हाला जर पुढे जाऊन वेबसाइट च्या मदतीने पैसे कमवायचे असल्यास तुमच्याकडे तुमचे स्वतःचे डोमेन नेम असले पाहिजे. जसे कि digitalpushkraj.com आणि त्यासोबतच एक चांगली होस्टिंग देखील असणे गरजेचे आहे.

रुपये २०००-३००० मध्ये तुम्हाला सहजपणे डोमेन आणि होस्टिंग या दोन्ही गोष्टी पूर्ण १ वर्ष साठी घेता येऊ शकतील.

आणि एकदा का तुम्ही डोमेन, होस्टिंग घेऊन तुमचा ब्लॉग सुरु केला कि मग तुम्हाला त्यांनतर यशस्वी होण्यासाठी पैशांपेक्षा तुमचा वेळ मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागेल.

त्यामुळेच तुम्ही म्हणू शकता कि ब्लॉगिंग हे Free नसून त्या साठी थोड्या प्रमाणावर पैसे आणि मोठ्या प्रमाणावर वेळ खर्च करावा लागतो.

४. तुम्हाला Technology विषयी जास्त माहिती हवी

Man writing website script on laptop

लोकांना खूप मोठा प्रश्न पडतो कि मला HTML, कोडींग विषयी काहीच माहिती नाही, माझ टेक्निकल बॅकग्राऊंड नाही, तर मग मी कशाप्रकारे वेबसाइट बनवणार, डिजिटल मार्केटिंग शिकणार?

माझ्यावर विश्वास ठेवा तुम्हाला टेकनिकल नॉलेज असण्याची काहीही एक गरज नाही, आजकाल तुम्ही देखील सहजपणे वेबसाइट बनवू शकता किंवा डिजिटल मार्केटिंग देखील करू शकता. मी मदत करेल तुम्हाला हे सर्व अगदी सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी.

आजकाल असे काही टूल्स उपलब्ध आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही कोडींग शिवाय सहजपणे वेबसाइट बनवू शकता.

आणि हो, हे खर्च शक्य आहे. तुम्ही अगदी ई-कॉमर्स वेबसाइट सुद्धा सहजपणे त्या टूल्स च्या मदतीने बनवू शकता.

५. ब्लॉगिंग साठी तुम्हाला एक उत्तम लेखक असले पाहिजे

Man thinking how to write

प्रत्येकजण एक उत्तम लेखक असू शकत नाही.

मी सुद्धा नाहीये. मी अजून पण शिकत आहे, रोज नाव नवीन प्रयोग करून माझ्या लिखाणात सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे.

तसेच तुम्हाला उत्तम लेखकी असणे गरजेचे नाही परंतु उत्तम प्रकारे लिहिता यावे या साठी तुम्ही प्रयत्न करणे गरजेचे आहे.

जेव्हा मी ब्लॉगिंगची सुरवात केली तेव्हा मी साधे ५०० शब्दांचा ब्लॉग पण लिहू शकत नव्हतो. परंतु तरी देखील मी रोज लिहित राहिलो, सर्व करत राहिलो आणि आता मी २००० शब्दांचा ब्लॉग सुद्धा सहजपणे लिहून घेतो.

तुम्हाला तुमची कमजोरी ओळखता आली पाहिजे आणि तुम्ही ते मान्य करून त्यात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. या साठी रोज काहीतरी लिहीत राहणे हाच उत्तम मार्ग आहे एक उत्तम लेखकी आणि ब्लॉगर बनण्यासाठी.

६. तुम्ही रोज एक तरी ब्लॉग वेबसाइट वर पोस्ट केला पाहिजे

Coffee cup and pen

नाही.

जास्त लोक या मुळेच ब्लॉगिंग सोडून देतात कि त्यांना वाटते, आपण रोज ब्लॉग पोस्ट Update केली नाही तर आपण यशस्वी होऊ शकत नाही.

परंतु तुम्ही किती लिहिता या पेक्षा तुम्ही कसे लिहिता हे महत्वाचे असते.

Quantity पेक्षा Quality महत्वाची असते.

समजा तुम्ही २० ब्लॉग पोस्ट लिहिलेल्या असतील परंतु त्या मध्ये काही क्वालिटीच (Quality) नसेल तर तुमचे visitors लगेच तुमच्या ब्लॉग वरून निघून जातील आणि समजा तुम्ही फक्त ५-६ ब्लॉग पोस्ट लिहिल्या आहेत आणि त्यात खूप Quality कन्टेन्ट (मौल्यवान माहिती) दिले आहे तर तुमचे visitors तुमच्या ब्लॉग वर जास्त वेळ व्यतीत करतील. तसेच पुन्हा ते तुमच्या ब्लॉग पोस्ट वाचण्यासाठी येतील.

आणि Google या सर्व ऍक्टिव्हिटीची माहिती track करत असतो आणि अशा Quality Content (मौल्यवान माहिती) असणाऱ्या वेबसाइट वर ते अजून जास्त visitors ना पाठवणार तसेच Google वर तुमची वेबसाइट Rank होण्यासाठी देखील तुम्हाला याची मदत होणार.

जर तुम्ही नियोजन करून प्रत्येक आठवड्याला एक किंवा दोन आठवड्याला एक पोस्ट update करत राहिलात तर तुम्हाला नक्की मदत होऊशकते शकते.

७ सुरवातीपासूनच तुमचा ब्लॉग परफेक्ट पाहिजे

Women creating blog website

लोकांचा असा हि गैरसमज असतो कि ब्लॉग सुरु करताना त्यांच्याकडे छान logo, वेबसाइट साठी चांगली थीम (Theme), योग्य (Proper) हेडलाइन्स/Titles पाहिजे.

नाही. तसं काहीच नसते.

महत्वाचं काय असते…

ती म्हणजे सुरवात,

सर्व परफेक्ट गोष्टी जुळवून मग भविष्यात कधी तरी सुरवात करण्यापेक्षा आज जस जमेल तस सुरु करणे हे १०० पटीने चांगलं आहे.

त्यामुळे परफेक्ट गोष्टींसाठी वाट बघत न बसता आज जे आहे त्यात सुरवात करा.

८. तुम्ही ब्लॉग लिहिला म्हणजे लोक तो वाचण्यासाठी आपोआप येणार

नाही, ते नाही येणार.

तुमचा ब्लॉग कितीही चांगला असुद्या, त्या मुळे कोणाच्या आयुष्यात चांगला बदल जरी होणार असेल तरी देखील ते तुमचा ब्लॉग वाचायला येणार नाही जो पर्यंत तुम्ही त्यांच्यापर्यंत तुमच्या ब्लॉग ची माहिती पोहचवत नाही.

चांगले लिहिण्यासोबतच लोकांपर्यंत त्याची माहिती पोहचवणे हे देखील खूप महत्वाचे आहे आणि बरेच लोक हेच विसरतात.

ते जास्त लक्ष फक्त खूप चांगल्याप्रकारे लिहिण्यासाठी देतात आणि त्या नंतर वाट बघतात कि कोणी तरी येईल आणि त्यांचा ब्लॉग वाचेल पण एक सुद्धा व्यक्ती येत नाही. मग त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि ते ब्लॉगिंग सोडून देतात.

Woman Shouting

तुम्हाला समजून घ्यायचे आहे का? कि आपल्या ब्लॉग वर लोकांना कसे घेऊन यायचे ते.

मी माझ्या पुढच्या ब्लॉग मध्ये तेच सांगणार आहे. त्या साठी तुम्ही माझे ब्लॉग वेळोवेळी वाचत राहा.

माझे नवीन ब्लॉग आल्यानंतर त्याची माहिती मिळविण्यासाठी खाली तुमचा Email id देऊन माझ्या ब्लॉग ला Subscribe करा.

तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ते देखील खाली कंमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. तसेच तुमच्या प्रतिक्रिया देखील मला कळवू शकता.

All The Best,

Digital Pushkraj

2 thoughts on “ब्लॉगिंग (Blogging) म्हणजे काय? आणि ब्लॉगिंग विषयीचे काही गैरसमज”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top