तुम्हालाही वेबसाईटच्या मदतीने पैसे कमवायचे आहे…? तर मग तुम्ही योग्य पेज वर आला आहात. या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कि तुम्ही वेबसाइटच्या मदतीने कोण कोणत्या योग्य मार्गाने पैसे कमवू शकता.
मी जेव्हा पासून वेबसाईट डिझायनिंग शिकवण्यासाठी सुरवात केली तेव्हा पासून मला सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे कि, वेबसाइटच्या मदतीने पैसे कसे कमवायचे?
साहजिकच आहे कि, प्रत्येकाला पैसे कमवायचे आहेत आणि जो कोणी माझ्याकडे वेबसाइट डिझायनिंग शिकण्यासाठी येतो त्या प्रत्येकाला ते शिकून त्याच्या मदतीने पैसे कसे कमवता येतील याची उत्सुकता असते.
तुम्हालाही असणारच, तर चला तर मग आता त्या विषयीच जाणून घेऊ या.
वेबसाईट संबंधित पुढील असे काही मार्ग मी आता तुम्हाला सांगणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही नक्कीच पैसे कमवू शकता.
1. Google AdSense
सर्वात जास्त लोकप्रिय असणारा मार्ग म्हणजे Google AdSense. तुम्ही तुमच्या वेबसाइटला Google AdSense सोबत जोडून (Connect करून) वेबसाइट वर Ad दाखवून त्याच्या मदतीने पैसे कमवू शकता.
Google AdSense हे पूर्णपणे Free आहे. तसेच, वेबसाइटच्या मदतीने पैसे कमविण्याचे हे सर्वात जलद आणि सोपे असे माध्यम आहे. फक्त या साठी तुमच्याकडे तुमची वेबसाइट असणे आवश्यक आहे. जेव्हा एखादा युजर तुमच्या वेबसाइट वर येतो आणि तो जेव्हा तुमच्या वेबसाइट वरील Ad वर क्लीक करतो किंवा त्याला ती Ad दिसते तेव्हा त्या Ad चे काही कमिशन तुम्हाला मिळते. अशा प्रकारे AdSense च्या मदतीने तुम्ही पैसे कमवू शकता.
या मध्ये तुम्ही किती पैसे कमवणार हे तुमच्या वेबसाइटच्या Traffic वर अवलंबून असते. Traffic म्हणजे तुमच्या वेबसाइट ला भेट देणारे युजर. जितकी जास्त Traffic म्हणजे जितके जास्त युजर तितकी जास्त कमाई (Earning).
2. अफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing)
पहिले थोडक्यात समजून घेऊ कि Affiliate Marketing काय असते. Affiliate Marketing म्हणजे एखाद्या कंपनीच्या किंवा बिजनेसच्या प्रॉडक्टची तुम्ही जाहिरात/मार्केटिंग करणे.
त्यासाठी तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर अकॉउंट सुरु करायचे असते, त्या नंतर त्यांच्या प्रॉडक्टची मार्केटिंग/जाहिरात करण्यासाठी तुम्हाला एक विशिष्ट लिंक दिली जाते आणि कोणीही जेव्हा तुमच्या या लिंक च्या मदतीने त्यांच्या वेबसाइटवर जाणून त्यांचे प्रॉडक्ट विकत घेणार तेव्हा त्याच्या बदल्यात तुम्हाला ठराविक असे कमिशन मिळते.
तुम्ही हे Affiliate Marketing वेबसाइटच्या मदतीने कसे करू शकता हे मी आता तुम्हाला थोडक्यात सांगतो.
पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही एखाद्या प्रॉडक्ट विषयी सविस्तर माहिती असणारे किंवा त्याच्या विषयी तुमचे मत (Review) असणारा ब्लॉग लिहून त्या मध्ये तुमची Affiliate Link Add करू शकता.
त्यासाठी आपण उदाहरण बघू या.
या उदाहरणामध्ये मी तुम्हाला E-commerce (Amazon, Flipkart etc.) Affiliate Marketing विषयी सांगणार आहे.
त्यासाठी मी मोबाईल चे उदाहरण घेत आहे.
जेव्हा तुम्हाला एखादा मोबाईल विकत घ्यायचा असतो तेव्हा तुम्ही सर्वात प्रथम Google वर जाऊन तुमच्या बजेट मधील वेग वेगळ्या मोबाईल विषयी माहिती शोधतात जेणेकरून तुम्हाला तुमच्या गरजेनुसार चांगल्यातला चांगला मोबाईल विकत घेता यावा.
आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे मोबाईल विषयी Google मध्ये Search करतात तेव्हा तुम्हाला ती माहिती बघण्यासाठी काही Websites च्या लिंक येतात आणि तुम्ही ती Website ओपन करून मोबाईल विषयी सविस्तर माहिती वाचतात.
याच सर्व माहिती मध्ये वरील फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे प्रत्येक मोबाईलची किंमत देखील दिलेली असते आणि त्याच्या समोर तो विकत घेण्यासाठी बटन मध्ये E-commerce Website (Amazon, Flipkart इ.) च्या लिंक दिलेल्या असतात. जसे वरील फोटो मध्ये Go To Store चे बटन दिले आहे.
आणि या लिंक म्हणजेच अफिलिएट (Affiliate) लिंक असतात. म्हणजे समजा तुम्ही या लिंक वर क्लीक करून Amazon च्या वेबसाइट वर जाऊन तो मोबाईल जर विकत घेतला तर ज्याची ती अफिलिएट लिंक आहे त्याला त्याचे काही ठराविक कमिशन मिळते.
हे मी फक्त Ecommerce अफिलिएट (Affiliate) विषयी सांगितले या सारखे अजून बरेच Affiliate प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. जेथे तुम्ही तुमचे Affiliate अकाउंट सुरु करू शकता.
3. फ्रीलांसिंग (Freelancing)
फ्रीलांसरला आपण एकप्रकारे Self-Employed देखील म्हणू शकतो. फ्रीलान्सर हे प्रोजेक्ट बेसिस वर काम करतात. जसे मी देखील एक Web Design फ्रीलान्सर म्हणून काम करतो म्हणजे जर कोणाला Website बनवून पाहिजे असेल तर त्यांना Website बनवून देण्याचे काम मी करतो. यालाच आपण फ्रीलांसिंग म्हणत असतो.
अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही व्यक्तीला, व्यावसायिकाला किंवा कंपनीला हवी ती Website बनवून देण्याचे म्हणजेच Web Design फ्रीलान्सरचे काम करू शकता.
Website कोणत्या प्रकारची आहे, ती बनविण्यासाठी वेळ किती लागू शकतो त्या नुसार तुम्ही त्या प्रोजेक्ट साठी पैसे घेऊ शकता.
Web Design स्किल च्या मदतीने पैसे कमविण्यासाठी हा एक सर्वात प्रभावशाली आणि उत्तम मार्ग आहे.
मी देखील सर्वात पहिले याच मार्गाने पैसे कमविण्यासाठी सुरवात केली होती.
लवकरच या विषयी सविस्तर माहिती असणारा Blog लिहिण्याचा मी प्रयत्न करेल. कारण या ब्लॉग मध्ये आपल्याला फक्त Web Design च्या मदतीने पैसे कमविण्याचे योग्य असे मार्ग बघायचे आहेत, त्यामुळे येथे आपण या विषयी सविस्तर नाही बोलू शकत.
4. व्यवसाय Online घेऊन जाणे
तुमचा स्वतःचा काही व्यवसाय असेल किंवा तुम्ही कोणी Professional असाल जसे कि डॉक्टर, वकील, LIC एजन्ट इत्यादी. तर तुम्ही तुमची स्वतःची वेबसाइट बनवून त्याच्या मदतीने सहजपणे जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची/कामाची माहिती पोहचवू शकता.
तसेच, डिजिटल मार्केटिंग जसे कि, Facebook Ads, Instagram Ads, Google Ads च्या मदतीने Online Ad करून तुमच्या व्यवसायासाठी जास्तीत जास्त ग्राहक मिळवू शकता.
तुमच्या व्यवसायाची वेबसाईट तुम्ही दुसरे कोणाकडून बनवून घेण्यापेक्षा स्वतः ती बनवली तर त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होऊ शकतो, कसे ते समजून घेऊ.
समजा तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी वेबसाईट दुसरे कोणाकडून बनवून घ्यायची आहे तर त्या साठी तुम्हाला खर्च खूप जास्त येऊ शकतो, कमीत कमी 10 ते 15 हजार रुपये खर्च तुम्हाला येऊ शकतो.
तेच जर तुम्ही स्वतः तुम्ही वेबसाईट बनवली तर तुम्हाला फक्त डोमेन आन होस्टिंग साठी 2 ते 3 हजार रुपये खर्च येणार या व्यतीरिक्त दुसरा कोणताच खर्च तुम्हाला येनार नाही.
अजून दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर तुमच्या वेबसाईट मध्ये काही बदल करायचा असेल आणि तुम्हाला त्या विषयी काही माहिती नसेल तर तुम्ही ज्याच्याकडून ती वेबसाइट बनवून घेतली त्याच्या कडूनच ते करून घ्यावे लागणार अशा वेळी तुम्हाला त्या समोरच्या व्यक्तीवर अवलंबून राहावे लागते कारण तो जेव्हा उपलब्ध असेल तेव्हा तुम्हाला तुमच्या वेबसाईट मध्ये बदल करून देणार.
आणि हे बदल करताना जर ते जास्त वेळ घेणारे असतील तर कदाचित तो पुन्हा तुम्हाला त्याच्या बदल्यात पैसे मागू शकतो म्हणजे पुन्हा तुमचा खर्च वाढणार.
तेच जर समजा तुम्ही स्वतः हे सर्व शिकलेले असाल तर तुम्ही स्वतःच तुम्हाला पाहिजे तेव्हा पाहिजे ते बदल तुमच्या वेबसाईट मध्ये सहजपणे करू शकता.
5. Sponsored Ads
समजा तुमची एखादी Blog किंवा News वेबसाइट आहे आणि त्या वर जर चांगल्या प्रमाणात Traffic (Visitors) येत असेल, तर तुम्ही तुमच्या वेबसाइट वर Sponsored Ads दाखवू शकता.
Sponsored Ad म्हणजे ज्या व्यक्तीला किंवा कंपनीला Advertisement ची गरज आहे त्यांची Ad आपल्या वेबसाइटवर दाखवून त्याच्या बदल्यात त्यांच्या कडून काही चार्जेस (पैसे) घेणे.
आणि अशा Ad साठी आपल्याला त्यांनीच दिलेले Poster किंवा Banner आपल्या वेबसाइट वर Add करून त्या मध्ये त्यांच्या वेबसाइट ची लिंक द्यायची असते, जर त्यांची वेबसाइट नसेल तर Poster वर त्यांचा Contact No. किंवा Email id Add करू शकतो.
Sponsored Ad साठी वेबसाईट वरील Visitors ची संख्या जास्त असणे गरजेचे आहे, तरच तुम्हाला अशा Ad मिळू शकतील. तुम्ही जर वेबसाइटची आता फक्त सुरवात करत असाल तर हा पर्याय तुमच्या साठी लगेच उपलब्ध नसेल.
6. Sponsored Content
आताच आपण Sponsored Ad विषयी माहिती घेतली, तर Sponsored Content देखील त्याच सारखे आहे परंतु या मध्ये तुम्हाला ज्या व्यवसायाची किंवा प्रॉडक्टची Ad करायची असेल त्याचे पोस्टर किंवा बॅनर वेबसाइट वर न दाखवता त्या व्यवसाय/प्रॉडक्ट विषयी Blog लिहायचा असतो.
ब्लॉग मध्ये तुम्ही प्रॉडक्ट किंवा व्यवसायाची माहिती लिहू शकता किंवा त्या विषयी तुमचा Review आणि त्या मध्ये त्याच्या वेबसाइटची लिंक Add करू शकता.
आणि अशा प्रकारच्या Blog ला Sponsored Content म्हटले जाते, या साठी सुद्धा आपल्या वेबसाइट वर चांगल्या प्रमाणात Traffic असणे गरजेचे आहे.
7. Selling Products (Online Product विकणे)
तुम्ही तुमची स्वतःची E-commerce वेबसाइट तयार करून आणि Online Ads Run करून त्या वेबसाइटच्या मदतीने Products विकू शकता.
तुम्ही E-commerce वेबसाइट तुमचे स्वतःचे प्रॉडक्ट असेल तर बनवू शकताच परंतु तुमचे स्वतःचे Product नसेल तरी देखील तुम्ही बनवू शकता, ते कसे त्याच विषयी पुढे समजून घेऊ या.
समजा तुमचे एखादे दुकान आहे जसे कि कपडे, किराणा, कॉस्मेटिक इत्यादी कशाचेही दुकान असुद्या तुम्ही त्याची Ecommerce वेबसाइट तयार करून तुमचे प्रॉडक्ट्स तुम्ही Online देखील विकू शकता.
इथे आता आपण जर एखादया व्यक्ती कडे प्रॉडक्ट असतील तर त्या विषयी बोललो, समजा तुमच्या कडे काहीच प्रॉडक्ट नाही. तर, तुम्ही देखील Ecommerce ची वेबसाइट बनवू शकता. त्या साठी 2 पर्याय आहेत.
एकतर तुम्ही सुरवातीला थोड्या प्रमाणात काही Products Wholesale मध्ये विकत घेऊन ते Online विकू शकता व मग नंतर हळू हळू तुम्ही तुमचे प्रॉडक्ट्स वाढवू शकता. हा एक पर्याय झाला आता दुसरा बघू.
जर तुम्हाला Products Wholesale मधेही घ्यायचे नसतील किंवा ते शक्य नसेल तर तुम्ही Drop shipping पर्याय वापरू शकता. Drop shipping म्हणजे एखादा व्यक्ती/किंवा कंपनी असते ज्यांच्याकडे खूप सारे प्रॉडक्ट्स उपलब्ध असतात. ते आपल्याला त्याचे Details व Photos आणि प्रत्येक प्रॉडक्टची Wholesale Price देतात ते तुम्ही तुमच्या Ecommerce च्या वेबसाइटवर Upload करू शकता आणि त्या प्रॉडक्ट ची Price दाखवताना त्यांनी सांगितलेल्या Price च्या वर तुम्हाला हवी ती Price तुम्ही ठरवू शकता.
आणि जेव्हा तुम्हाला या प्रॉडक्ट साठी ऑर्डर येणार तर तुम्हाला ती पुढे ज्यांचे प्रॉडक्ट्स आहेत त्यांच्या कडे ती पाठवावी लागते आणि त्या सोबत तुम्हाला मिळालेल्या Price मधून त्यांची ठराविक Price त्यांना देऊन बाकी पैसे तुम्ही तुमच्या कडे ठेवून घ्यायचे.
प्रॉडक्ट पॅक करण्यापासून तर ते डिलिव्हर करण्या पर्यंतचे सर्व काम तेच करून घेतात.
अशा प्रकारे तुमच्याकडे काहीही प्रॉडक्ट नसताना आणि त्याच्या साठी कोणत्याही प्रकारे गुंतवणूक न करता ते Wholesale ने विकत न घेता देखील तुम्ही तुमचा E-commerce चा व्यवसाय करू शकता.
8. ऑनलाइन कोर्स विकणे (Selling Online Courses)
तुमची एखाद्या विषयात आवड असेल किंवा एखाद्या विषयाचे तुमच्याकडे भरपूर नॉलेज असेल. तुमच्या कडे एखादे स्किल असेल तर तुम्ही त्या विषयीचे Online Course तयार करून त्याची वेबसाइट बनवून ते Sale करू शकता.
जसे, मी Website Designing आणि Digital Marketing चे Online कोर्सेस Sale करत असतो. तसेच तुम्ही दुसऱ्या कोणत्याही विषया मध्ये करू शकता.
आताच्या या काळात Online Learning चा Trend खूप वाढत आहे आणि या पुढेही तो खूप जास्त वाढणार आहे. त्या मुळे हा पर्याय देखील खूप चांगला ठरू शकतो. या साठी तुम्हाला तुमचा पूर्ण वेळ देण्याची गरज देखील नसते. एकदा विडिओ रेकॉर्ड करून त्याचा कोर्स तयार केला कि फक्त त्याचे Marketing करून तो Sale करायचा.
मी देखील Freelancing सोबत Online Course Selling करत असतो.
अशा प्रकारे वेबसाइटच्या मदतीने Earning करण्याचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. येथे मी तुम्हाला फक्त काही महत्वाचे पर्याय सांगितले या व्यतिरिक्त देखील अजून इतर बरेच पर्याय उपलब्ध आहेत. परंतु या सर्वांमध्ये मी येथे जे सांगितले ते सर्वात जास्त मह्त्वाचे आणि फायद्याचे आहेत.
आणि मी तुम्हाला जे काही पर्याय सांगितले तुम्ही त्या पैकी कोणेतेही एक किंवा एक पेक्षा जास्त कितीही पर्यायांचा एकाच वेळी Earning साठी उपयोग करू शकता. फक्त सुरवात करताना कोणता तरी एकच पर्याय सुरवातीला निवडायचा आणि मग त्या मध्ये व्यवस्थित Settle झाले कि मग दुसऱ्या पर्यायाचा पण तुम्ही विचार करू शकता.
जसे, मी सुरवातीला Freelancing पासून सुरवात केली, 1-2 वर्षे फक्त Freelancing केले. नंतर Earning वाढविण्यासाठी Online Course Selling आणि Affiliate Marketing ची देखील सुरवात केली म्हणजे एका पर्याय पासून सुरवात करून Earning साठी नंतर मी एक पेक्षा जास्त माध्यम सुरु केले, कारण सुरवात महत्वाची असते.
आणि हो, हे सर्व तुम्ही Full Time देखील करू शकता किंवा तुमचा काही व्यवसाय असेल, तुम्ही Job करत असाल किंवा तुमचे शिक्षण चालू असेल तरी देखील तुम्ही Part Time सुद्धा या पैकी कोणत्याही पर्यायावर काम करू शकता. कारण या साठी खूप जास्त वेळ देण्याची गरज नसते. रोज अर्धा-एक तास किंवा सुट्टीच्या दिवशी 3-4 तास दिले तरी देखील तुम्ही या पैकी काहीही सहजपणे करू शकता.
मी वर सांगितलेल्या पर्यायांपैकी कोणत्या पर्याया विषयी तुम्हाला अजून सविस्तर जाणून घ्यायला आवडेल ते Comment करून सांगायला विसरू नका जेणे करून त्या विषयी मी लवकरच Blog लिहिण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही खाली Comment करून सांगू शकता.
धन्यवाद!
डिजिटल पुष्कराज