ब्लॉगिंग साठी योग्य विषय कसा निवडावा?

तुम्हाला एक यशस्वी आणि प्रोफेशनल ब्लॉगर व्हायचे आहे? ब्लॉगिंग मध्ये सुरवात करून पुढे तुम्ही ब्लॉगिंग कडे करिअर ऑप्शन म्हणून देखील बघू शकता.

तुम्ही जर प्रोफेशनल ब्लॉगर झालात तर तुमच्या कडे वेळ, स्थान आणि आर्थिक स्वातंत्र्य असेल. ब्लॉगिंग तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्हाला हवे त्या ठिकाणावरून करू शकता आणि याच्या मदतीने खूप सारे पैसे देखील कमवू शकता. हे नक्कीच मजेदार आणि फायद्याचे आहे.

परंतु तुमचे ब्लॉगिंगचे यश तुम्ही ब्लॉगिंग साठी निवडलेल्या विषयावर अवलंबून आहे. योग्य विषय निवडणे हे ब्लॉगिंग मध्ये यशस्वी होण्यासाठीची सर्वात पहिली आणि महत्वाची पायरी आहे.

ब्लॉगसाठी योग्य विषय निवडण्यात तीन मुख्य घटकांचा सहभाग असतो. चला तर त्यांच्याविषयी सविस्तर समजून घेऊ या.

1. आवड (Passion)

प्रथम तुमची खरी आवड शोधण्याविषयी बोलूया.

जरा विचार करा तुम्ही सर्वात जास्त कोणत्या विषयात इंटरेस्टेड असतात. तुम्ही कोणत्या प्रकारचे पुस्तके,ब्लॉग वाचतात, कोणत्या वेबसाइटला भेट देतात.

आणि याचाही विचार करा कि तुम्ही तुमच्या मित्रांसोबत जास्त कशा विषयी चर्चा करतात.

Photo by Helena Lopes on unsplash.com

कारण तुम्ही कोणत्या विष्याविषयी जास्त माहिती मिळवत असतात फक्त हे महत्वाचे नसून, तुमच्याकडे जेव्हा त्या विषया संबंधित काही नवीन विचार, कल्पना असतात आणि तुम्हाला ते इतरांसोबत शेयर करायला आवडते ते महत्वाचे आहे.

तर तुम्हाला कोणत्याही विषयामध्ये इंटरेस्ट असू शकतो. ट्रॅव्हल, फिटनेस, फूड किंवा टेकनॉलॉजि इत्यादी काहीही.

परंतु वरील किंवा तुमचा इंटरेस्ट असलेल्या कोणत्याही विषया संबंधित तुम्हाला वाचयला आवडत असेल, परंतु त्या पैकी असा कोणता विषय आहे कि, ज्याच्या विषयी तुम्हाला बोलायला आणि चर्चा करायला आवडते याचा विचार करा.

कारण ब्लॉगिंग देखील काही वेगळे नाहीये. या मध्ये तुम्ही तुमच्या वाचकांसाठी, मित्रांसाठी ब्लॉग लिहीत असतात. जसे कि, तुम्ही त्यांच्यासोबत काही माहिती किंवा तुमचे विचार शेयर करत आहेत.

Photo by AbsolutVision on Unsplash

आणि हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा तुमच्याकडे त्या विषय संबंधित तुमचे स्वतःचे काही विचार, कल्पना असतील, आणि मग तुम्ही तुमचा लॉग उत्तम प्रकारे लिहू शकाल.

तुम्हाला इतर माध्यमांमार्फत माहिती मिळवून ती दुसऱ्या कोणत्या तरी माध्यमाद्वारे फक्त लोकांपर्यंत पोहचवायची नाहीये, तर त्या मध्ये तुमचे स्वतःचे विचार, तुमच्या कल्पना समाविष्ट करून ते योग्य रित्या लोकांपर्यंत पोचवायचे आहे त्याला खरं ब्लॉगिंग म्हटले जाते.

समजा तुम्ही एखाद्या गोष्टी विषयी काही वाचले आणि त्यालाच तुमच्या ब्लॉग चा टॉपिक बनवायचे ठरवले, परंतु तुम्हाला त्या मध्ये आवड नाहीये किंवा तुम्हाला त्या विषयी बोलायला जास्त आवडत नाही आणि एखादा असा विषय ज्यामध्ये तुम्हाला आवड नाहीये त्याच्या मदतीने तुम्ही तुमचा ब्लॉग सातत्याने सुरु ठेवणे खूप कठीण आहे.

तुम्ही नेहमीच नवीन संशोधन करत राहू शकत नाही आणि नवीन लेख घेऊन येऊ शकत नाही. त्याने तुम्ही तुमच्या ब्लॉग category मध्ये लीडर होऊ शकत नाही. तुमच्याच विषयात खूप जास्त आवड (Passionate) असलेले लोक असतील ते तुमच्या पेक्षा चांगल्या प्रकारे काम करू शकता.

कारण जेव्हा आपल्याला एखाद्या विषया विषयी फारच जास्त आवड असते तेव्हा आपल्याला त्या विषयासंबंधित लेख लिहिण्यासाठी संशोधन नाही करावे लागत, ते आपोआप आपल्या आतून येते. त्या विषयी आपण पाहिजे तेवढे ते पण अतिशय उत्तम रित्या लिहू शकतो.

त्यामुळे ब्लॉग साठी विषय निवडताना तुमची आवड कशात आहे हे ओळखणं हि खूप महत्वाची पायरी आहे.

2. बाजारातील संधी (Market Opportunity)

Photo By Ildo Frazao

तुम्ही जर मार्केट मध्ये सामील (Involved) असाल तर तुम्हाला मार्केट मधील मागणी विषयी माहीत असते.

माझे उदाहरण द्यायचे झाले तर, मी डिजिटल मार्केटिंग हा विषय का निवडला?

मी जेव्हा डिजिटल मार्केटिंग विषयी शिकण्यास सुरवात केली तेव्हा सुरवातीला मी You Tube वरील विडिओ द्वारे शिकत होतो. तेव्हा माझ्या एक गोष्ट आली कि जिथे तुम्हाला Free मध्ये काही मिळत असते तिथे पाहिजे तशी योग्य माहिती मिळत नाही.

त्यामुळे मग मी काही कोर्सेस विकत घेऊन त्याद्वारे शिकण्यास सुरवात केली. मात्र त्या सर्व कोर्सेसची फी खूपच जास्त होती.

येथे मला संधी लक्षात आली कि Free मध्ये जी काही माहिती उपलब्ध आहे ती चांगल्याप्रकारे शिकण्यास पुरेशी नाहीये आणि जे काही पेड कोर्सेस आहेत त्याची फी हि खूपच जास्त आहे. तसेच, हे सर्व मराठी मध्ये पाहिजे त्या पद्धतीने उपलब्ध नाही.

त्यामुळे हे सर्व ४-५ वर्ष चांगल्याप्रकारे शिकून, त्यामध्ये अनुभव मिळवून आणि हे सर्व काही प्रथम स्वतः Apply करून बघितले आणि त्याचे जेव्हा खूपच चांगले Result येऊ लागले तेव्हा ठरवले कि आता हि सर्व माहिती इतर लोकांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे.

त्यासाठी मी सर्व प्रथम ब्लॉग सुरु केला आणि त्या सोबतच Website Designing आणि Digital Marketing चे कोर्सेस स्टार्ट केले तेही खूप कमी फी मध्ये आणि हे सर्व पूर्णपणे मराठीमधून शिकवण्याचा मी निर्णय घेतला. कारण मला जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहचायचे आहे.

अशाप्रकारे डिजिटल मार्केटिंग फिल्ड मध्ये असताना माझ्या लक्षात आले होते कि या साठी मार्केट मध्ये खूप मोठयाप्रमाणावर संधी उपलब्ध आहे. मात्र, मराठी मधून असे कोणीच नाहीये कि जो मार्केटला टार्गेट करत आहे त्यामुळे मी या संधीला माझी जबाबदारी समजून त्या मध्ये काम करण्याचे ठरवले.

Photo by Martin Newhall on unsplash.com

लोक कशाची मागणी करत आहे आणि मार्केट मध्ये कशाची गरज आहे हे जाणून घ्या करीत Keyword Research हा देखील एक उत्तम मार्ग आहे.

Search Engine मध्ये लोक काय Search करतात हे जाणून घेण्याकरिता तुम्ही पुढील Tools चा वापर करू शकता.

 1. Google Trends
 2. Google Auto Suggest
 3. Quora
 4. YouTube Channel

या बेसिक Tools च्या मदतीने तुम्ही बघू शकता कि लोक नक्की कोणत्या गोष्टी search करतात.

याशिवाय तुम्ही खालीलपैकी अजून काही Advanced Keyword Research tools चा वापर करू शकता.

 • Ahrefs
 • SEMRush
 • Uber Suggest
 • Google Keyword Planner
 • Keywords Everywhere
 • Word Tracker etc.

आणि हो जर तुम्ही विचार करत असाल कि जिथे Competition (स्पर्धा) नाही असा विषय आपण निवडू तर तुम्ही खूप मोठी चूक करताय कारण जर एखाद्या विषयात जर competition नसेल तर कदाचित त्याला मागणी देखील नसेल.

तर तुम्ही हि गोष्ट समजणे खूप महत्वाचे आहे कि Competition (स्पर्धा) हि केव्हाही चांगली असते. जितकी जास्त competition तितकी जास्त मागणी हे समजणे महत्वाचे आहे.

3. प्रतिभा (Talent)

Photo by Loic Leray on Unsplash

तिसरा महत्वाचा घटक म्हणजे Talent. समजा तुम्ही निवडलेल्या विषयात तुम्हाला फार आवड (Passion) आहे. त्यासाठी Market Opportunity (मार्केट मधील मागणी) देखील भरपूर आहे. परंतु त्या विषयावर लिहिण्या साठीची प्रतिभाच तुमच्या कडे नाही आणि तुम्ही त्या विषयी पाहिजे तितक्या चांगल्या प्रकारे लिहू शकत नसाल, तर तुम्ही ब्लॉगिंग मध्ये जास्त काळ टिकू नाही शकत.

परंतु येथे एक गोष्ट चांगली आहे , कि तुम्ही कोणत्याही विषयातप्रतिभा मिळवू शकता, त्या मध्ये expert होऊ शकता. परंतु जर आपण पहिल्या आणि दुसऱ्या घटकाचा जर विचार केला तर तुम्ही स्वतःहून एखाद्या विषयात आवड (Passion) निर्माण नाही करू शकत किंवा तुम्ही त्यासाठी Market Opportunity (संधी) देखील उपलब्ध नाही करू शकत परंतु तुम्ही कोणत्याही विषयात अभ्यास करून, सर्व करून प्रतिभा मात्र मिळवू शकता.

निष्कर्ष

तिन्ही घटक तुम्हाला जितके जास्त जुळवता येतील तितका जास्त प्रयत्न करा म्हणजे तुमचा विषय तिन्ही घटकांमध्ये योग्य रित्या बसला पाहिजे.

Passion (अति जास्त आवड), Market Opportunity (मार्केट मधील संधी), Talent (प्रतिभा) या तिन्ही गोष्टीं सोबत तो योग्य रित्या जुळून आला पाहिजे.

मी आशा करतो कि या ब्लॉग मुळे तुम्हाला तुमचा विषय निवडण्यासाठी नक्कीच मदत झाली असेल.

तुमच्या ब्लॉगिंगच्या प्रवासासाठी तुम्हाला शुभेच्छा!

तुम्हाला अजून देखील काहीही प्रश्न असतील तर खाली Comment बॉक्स मध्ये नक्की विचारा. तसेच तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि त्या मधून काय शिकायला मिळाले ते Comment बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा.

2 thoughts on “ब्लॉगिंग साठी योग्य विषय कसा निवडावा?”

 1. Manohar Bhandare

  छान. आपला लेख खूपच छान. सर मी आपल्याकडे वेबसाईट कोर्स केलेला आहे.साहित्याचा शिक्षक आहे तर ब्लॉग साठी कोणता विषय निवडावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top